SBI Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला ५७४ रुपये गुंतवा अन् लाखो रुपये मिळवा

SBI Har Ghar Lakhpati Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी हर घर लखपती योजना राबवली आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला ५७४ रुपये गुंतवावे लागतात. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर लाखो रुपये मिळतात.
SBI Scheme
SBI SchemeGoogle
Published On

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नागरिकांसाठ नेहमी नवनवीन योजना राबवत असते. स्टेट बँकेने नुकतीच नागरिकांसाठी दोन नवीन डिपॉझिट योजना लाँच केल्या आहेत. स्टेट बँकेने हर घर लखपती आणि एसबीआय पैट्रेन्स या दोन योजना राबवल्या आहे.

स्टेट बँकेने शुक्रवारी ३ जानेवारी रोजी या योजना लाँच केल्या.या योजनेत तुम्ही दर महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून लखपती बनू शकतात. हर घर लखपती ही एक आरडी योजना आहे. या योजनेत महिन्याला ५९१ रुपये गुंतवून १० वर्षात १ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला ५७४ रुपये गुंतवायचे आहे. (SBI Scheme)

SBI Scheme
Government Scheme: या राज्याचे सरकार महिलांना देतंय महिन्याला २५०० रुपये; मइया सन्मान योजना नक्की आहे तरी काय?

स्टेट बँकेची दुसरी SBI Patrons ही योजना ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठ सुरु करण्यात आली आहे. ही एक फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे.

स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हर घर लखपती योजनेत तुम्ही ३ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्ही कमीत कमी १ लाख रुपये मिळवू शकतात.या योजनेत जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे जमा केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.या योजनेत तुम्ही नेहमी बदल करु शकत नाही.

या योजनेत जर तुम्ही एकदम अॅडव्हान्स पेमेंट केले तर त्याचा परिणाम मॅच्युरिटीवर होऊ शकतो.या योजनेत जर तुम्ही सलग ६ महिने पैसे गुंतवले नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल. (SBI Har Ghar Lakhpati Yojana)

SBI Scheme
SBI Scheme : ४४४ दिवसांत मोठा फायदा, एसबीआयची खास FD स्कीम, सुरक्षित गुंतवणूक अन् भरघोस रिटर्न

हर घर लखपती योजनेत तुम्हाला ६.२५ टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.त्यामुळे या योजनेत कमी गुंतवणूकीत तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

SBI Scheme
Government Scheme: लाडकी बहीण योजनेसारखेच 'या' योजनांचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com