Government Scheme: या राज्याचे सरकार महिलांना देतंय महिन्याला २५०० रुपये; मइया सन्मान योजना नक्की आहे तरी काय?

Maiya Samman Yojana: झारखंड सरकारने महिलांसाठी खास मइया योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.
 Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारनंतर आता विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारनंतर झारखंड सरकारने मईया योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत आता महिलांना २५००रुपये मिळतात.

झारखंड सरकारची मईया योजना ही प्रसिद्ध झाली आहे. या योजनेत आधी १००० रुपये दिले जायचे. ही रक्कम वाढवून २५०० करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहे.या योजनेत आतापर्यंत ५ हप्ते देण्यात आले आहेत.या योजनेचा लाभ राज्यातील ५० लाख महिलांना मिळणार आहे. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Maiya Sanman yojana)

 Government Scheme
Government Scheme: तरुणांना मिळणार ५० लाखांची मदत, महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती योजना नक्की आहे तरी काय?

मईया सन्मान योजनेअंतर्गत आता या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार आहे. या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मिळते. या योजनेत आता सरकार महिलांकडून पैसे परत घेणार आहेत.

ज्या महिलांनी खोटे कागदपत्र सादर करुन या योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांकडून पैसे पर घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेत २१ ते ४९ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी झारखंडमधील महिलांना अंगणवाडीत जाऊन अर्ज करायचा आहे.फॉर्म भरुन महत्त्वाचे कागदपत्र सादर करायची आहे.

 Government Scheme
ELI Scheme: EPFO ने आणली लय भारी योजना! या कर्मचाऱ्यांना मिळणार १५००० रुपये

इतर राज्यांच्या योजना (Other State Scheme)

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेसारखीच इतर राज्यांनीदेखील योजना राबवल्या आहेत. झारखंड सरकारने मइया सन्मान योजना राबवली आहे.

लाडली बहना योजना-मध्यप्रदेश

मध्यप्रदेश सरकारने लाडली बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १२५० रुपये दिले जातात.

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना-उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश सरकारची मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना खूप प्रसिद्ध आहे.यायोजनेत मुलींना २००० रुपये दिले जातात. तर मुलींना पदवी अभ्यासासाठी ५००० रुपयांची मदत केली जाते.

मुख्यमंत्री राजश्री योजना- राजस्थान

राजस्थान सरकारच्या मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते. मुलींना ५०,००० रुपये दिले जातात.

 Government Scheme
PM Mudra Scheme: आता बिनधास्त सुरु करा स्वतः चा व्यवसाय; सरकार देतंय २० लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com