Post Office Scheme google
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; वाचा कॅल्क्युलेशन

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही दररोज २०० रुपये गुंतवून १० लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम

रोज २०० रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा

गुंतवणूकीचं कॅल्क्युलेशन वाचा

प्रत्येकजण काही न काही आर्थिक बचत करत असतात. पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. ही रक्कम जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर सुरक्षित असते. त्यामध्ये कोणतीही जोखीम नसते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. या योजनेत रोज फक्त २०० रुपये गुंतवून तुम्ही १० लाख रुपये जमा करु शकतात. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूकीत जास्तीत जास्त परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेत तुम्ही फक्त १०० रुपये गुंतवून अकाउंट ओपन करु शकतात. पोस्टाच्या बचत योजनेत स्वतः सरकार गॅरंटी देते. त्यामुळे चांगली कमाई होते.

पोस्टाच्या या योजनेत मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्ही अजून ५ वर्षांपर्यंत वाढवू शकतात. या योजनेत लहान लहान गुंतवणूक करुन तुम्ही चांगला फंड जमा करु शकतात. या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर लोनची सुविधादेखील मिळते. यावर तुम्ही ५० टक्के लोन घेऊ शकतात. त्यावर २टक्के व्याजदर आकारले जाते.

२०० रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा

तुम्ही २०० रुपये रोज गुंतवले तर १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करु शकतात. तुम्ही दररोज २०० रुपये गुंतवले तर महिन्याला ६००० रुपये गुंतवणार आहात. म्हणजेच पाच वर्षात तुम्ही ३,६०,००० रुपये गुंतवू शकतात. यावर ६८,१९७ रुपये व्याज मिळेल. तुम्ही अजून पाच वर्षात गुंतवणूक केली तर एकूण ७.२० टक्के रक्कम गुंतवता. त्यावर २,०५,१३१ रुपये व्याज मिळते.म्हणजेच दहा वर्षात १०,२५,१३१ रुपये तुम्हाला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra News Live Update: सांगलीत मुसळधार पावसाचा कहर; हरिपूर येथे वारणा नदी पात्राबाहेर, शेती पाण्याखाली

Raigad Flood: अंबा नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका; 28 जणांचं थरारक रेस्क्यू, व्हिडिओ व्हायरल

₹200 मध्ये Airtel ची मोठी धमाल! JioHotstar सह 18+ OTT अॅप्स फ्री

Morning Water Benefits: सकाळी उठल्या उठल्या पाणी पिताय? शरीरावर काय होतो परिणाम; वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT