PM Ujjawala Yojana Saam Tv
बिझनेस

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

PM Ujjawala Yojana: सरकारने पीएम उज्जवला योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना गॅस सिलिंडरसोबतच सब्सिडीदेखील दिली जाते. या योजनेत महिलांना मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी खास पीएम उज्जवला योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जातात. दरम्यान, आता दोन गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी १८३० रुपये दिले जाणार आहेत. एक गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी ९१५ आणि दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर रिफिल करताना ९१५ रुपये मिळणार आहे. दिवाळीच्या मूहूर्तावर उत्तर प्रदेश सरकारने महिलांना गिफ्ट दिले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे.

बुधवारी लखनऊ येथे या योजनेची सुरुवात केली. दरम्यान, याच कार्यक्रमात महिलांना सब्सिडीचे चेकदेखील देण्यात आले आहे. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

गोरखपुर जिल्ह्यातील एकूण दोन लाख ९३ हजार महिला उज्जवला योजनेच्या लाभार्थी आहेत. या महिलांना आता अतिरिक्त गॅस सिलिंडर दिला जात आहे. पूर्वी महिला चुलीवर जेवण बनवायच्या. यामुळे त्यांना त्रास व्हायचा. दरम्यान, चुलीच्या धुरापासून त्यांची मुक्तता करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

काय आहे योजना? (What Is Ujjawala Yojana)

लाभार्थी महिलांना सिलिंडर भरताना रोख रक्कम द्यावी लागते. यानंतर आधारवर आधारित पेमेंटद्वारे सब्सिडीची रक्कम महिलांचया बँक खात्यात जमा केली जाते. एका गॅसची रक्कम ९१५ रुपये आहे. ज्यात केंद्र सरकार ३५९ रुपये देते तर राज्य सरकार ५५६ रुपये देते.

उज्जवला ३.० योजना लवकरच सुरु होणार (Ujjawala Yojana 3.0)

दरम्यान, याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी संगितले की, प्रधानमंत्री उज्जवला योजना ३.० लवकरच सुरु होणार आहे. या योजनेत ज्या महिलांना गॅस कनेक्शन मिळाले नाही त्या महिला अर्ज करु शकतात.

पात्रता (PM Ujjawala Yojana Eligibility)

अनुसुचित जाती, जमातीमधील महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात. महिलांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे. कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: बोलके डोळे अन् हसरं सौंदर्य, वैदेहीचे फोटो पाहून नजर लागेल

Maharashtra Live News Update:अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट नाकारले जात आहे.

Marathi Actress: बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्रींना ओळखलं का? हे फोटो एकदा पाहा

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंग करायला आवडतं? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

SCROLL FOR NEXT