PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: हे काम आताच करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana KYC Process: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एक काम करावे लागणार आहे.अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी. पीएम किसान सन्मान निधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. या योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्तादेखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एक काम करावे लागेल, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाही.

केवायसी अनिवार्य

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. केवायसी म्हणजे तुमची माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी करणे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या ई-केवायसी करु शकतात.

केवायसी कसं करावं?

सीएससी सेंटर

केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जावे लागेल. तिथे बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी केले जाणार आहे.

घरबसल्या ई-केवासी

तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करु शकतात. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.याचसोबत पीएम किसान अॅपवर जाऊन केवायसी करु शकतात.

तुम्हाला सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर फार्मर्स कॉनरवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल.

त्यावर क्लिक करा अन् आधार नंबर टाका.

यानंतर तुम्हाला आधारवर लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT