
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना २०वा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेत आतापर्यंतत १९ हप्ते देण्यात आले आहेत. जून महिन्यात २०वा हप्ता येऊ शकतो.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना मागचा १९वा हप्ता फेब्रुवारी त आला होता. त्यानंतर आता २०वा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आला आहे. यामध्ये ९.८ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेत १८वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला आहे. १९वा हप्ता फेब्रुवारीत दिला गेला आहे. आता २०वा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे.
पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत शेतीच्या उपयोगाच्या वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी २००० रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी करा चेक
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइटला भेट द्या.
यानंतर Farmers Corner सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर Beneficiary List वर क्लिक करा.
यानंतर तुमचा नवीन फॉर्म उघडणार आहे. यामध्ये राज्य, जिल्हा आणि गावाचे नाव लिहावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला Get Report या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची नावे मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.