TRAI alert 2025: Alert! केवायसी कॉल scam पासून सावध व्हा, अन्यथा...; TRAI ने दिला मोठा इशारा

TRAI Latest Alert 2025: TRAI ने २०२५ मध्ये सिम वापरणाऱ्यांसाठी फेक केवायसी कॉल्सबाबत इशारा दिला आहे. संचार साथी पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि सायबर स्कॅमपासून तुमचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवा.
TRAI Latest Alert 2025
TRAI alert 2025google
Published On

Telecom Regulatory Authority of India : प्रत्येक घरामधल्या व्यक्तीकडे स्वत: चा मोबाईल असतो. मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असतात. त्यामध्ये तुमचे फोटो, तुमची कागदपत्रे, तुमचा Emali,त्याचा पासवर्ड, तसेच तुमच्या बॅंक अकाउंटमधले पैसे या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात. मात्र टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्वाचा इशारा दिला आहे. यामध्ये सिम बंद करण्यासंबधीत कॉल किंवा केवायसी अपडेट असा कॉल येतो. हे बनावट फोन कॉल तुमचं बॅंक खातं रिकाम करतात.

तुमच्या मोबाईल क्रमांकावर सतत केवायसी अपडेटचे कॉल किंवा मेसेजेस येत असतील तर सावध व्हा. असा इशारा टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने दिला आहे. तसेच त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ती माहिती पुढील प्रमाणे आहे.

१. केवायसी किंवा इतर पर्सनल कोणत्याही गोष्टी TRAI कॉलवर विचारत नाहीत.

२. TRAIला कोणताही व कोणाचाही मोबाईल नंबर बंद करण्याचा अधिकार नाही.

३. ज्या व्यक्तींची थकबाकी किंवा बिल अपूर्ण असल्यास काही विशिष्ट कंपन्या त्यांचा नंबर ब्लॉक करतात.

४. जिओ, एअरटेला या टेलिकॉम कंपन्याच तुमचा नंबर ब्लॉक करू शकतात.

५. केवायसीसाठी कोणत्याही कंपन्या कॉल करून विचारपूस करत नाहीत.

TRAI Latest Alert 2025
Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील घर कुठे आहे?

फेक कॉल आल्यास काय करावे? (What to do if you receive a fake call?)

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या माहितीमध्ये असे नमुद केले आहे की, कोणत्याही बाह्य एजन्सीला केवायसी किंवा सीम कार्जशी संबंधित कॉल करण्याची परवानगी दिलेली नाही. TRAI ने युजर्सना कोणत्याही बनावट कॉल्सवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच तुम्हाला बनावट कॉल वारंवार येत असतील तर काय करावे? यावर काही उपाय दिले आहेत.

१. तुम्हाला कोणतीही तक्रार दाखल करायची असल्यास तुम्ही राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरिक संपर्क साधा.

२. Sanchar Saathi Portal app चा वापर करून सुद्धा तुम्ही तक्रारी नोंदवू शकता.

३. app मध्ये तुम्हाला चक्षू या लिंकवर क्लिक करून समस्या मांडता येऊ शकते.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक सेफ ठेवू शकता. तसेच भारत सरकार जुने सिम कार्ड्स बदलण्याची तयारी करत आहे. त्यामध्ये जुने सीम कार्ड बदलून नवीन आणण्याची शक्यता आहे. हा निर्णय देशाच्या सायबर सुरक्षा केंद्राने घेतला आहे.

TRAI Latest Alert 2025
Ground Zero Movie: जुळून येती रेशीम गाठीमधला कलाकार चमकणार बॉलिवूडमध्ये, सिरियल किसरच्या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com