PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० येणार, अधिकृत तारीख आली समोर

PM Kisan Yojana 22nd Installment Date Announced: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची अधिकृत घोषणा झाली आहे. १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची घोषणा

१३ मार्चला खात्यात जमा होणार २००० रुपये

तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता २००० रुपये जमा केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा केला जाणार आहेत. त्यामुळे ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहे.

केंद्र सरकारने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पीएम किसानचा २२वा हप्ता १३ मार्च रोजी जमा केला जाईल, असं त्याल लिहलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी फेब्रुवारी महिनाभर पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार होते.

१३ आणि १४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते आसामध्ये असणार आहेत. १३ मार्च रोजी ते कोकराझार दौऱ्यावर असणार आहे. यानंतर गुवाहाटी येथे कार्यक्रम होणार आहे. त्यामुळ या कार्यक्रमात पैसे ट्रान्सफर केले जाण्याची शक्यता आहे.

तुम्हाला पैसे येणार की नाही? (PM Kisan Yojana Status Check)

पीएम किसान योजनेचा स्टेट्‍स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जायचे आहे.

यानंतर Know Your Status वर क्लिक करायचे आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाका.

यानंतर ओटीपी भरुन तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसणार आहे. यावरुन तुम्हाला पैसे येणार की नाही हे कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT