PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; तुम्हाला ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

PM Kisan Yojana 22nd Installmemt Date: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. दरम्यान, तुम्हाला पैसे येणार की नाही हे ऑनलाइन पद्धतीने चेक करा.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत अपडेट

कधीही येऊ शकतो २२वा हप्ता

तुम्हाला पैसे येणार की नाही?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार याची शेतकरी वाट पाहत आहेत.पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. परंतु अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ३० लाख शेतकऱ्यांना झटका, ₹२००० झाले बंद; पीएम किसान योजनेतून वगळले, कारण काय?

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता लांबणीवर गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात पैसे येतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर होळीआधी शेतकऱ्यांना २००० रुपये मिळतील, असं सांगितलं होतं. मात्र, अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. आता लवकरच हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे जाणून घ्या.

पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही?

पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला होमपेजवर Beneficiary List ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचे आहे. यानंतर गेट रिपोर्ट या बटणवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दिसणार आहे.

या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे चेक करु शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानच्या हप्त्याआधीच शेतकऱ्यांना गिफ्ट; कृषी मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

स्टेट्‍स कसा चेक करायचा? (PM KIsan Yojana Status Check)

पीएम किसान योजनेत तुम्ही स्वतःचा स्टेट्‍सदेखील चेक करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला Know Your Status सेक्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर कॅप्चा कोड टाका. यानंतर तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे कळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० हवेत? आजच करा eKYC; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com