PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेचा हप्ता कधी दिला जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्याआधी शेतकऱ्यांना हे काम करायचे आहे. अन्यथा त्यांना पीएम किसानचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची बातमी

लाभार्थी शेतकऱ्यांनी हे काम कराच

पीएम किसान योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असं सागितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही.

पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे ५ दिवस उरले आहेत तरीही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम आताच करा

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार नाही. याचसोबत फार्मर आयडीदेखील गरजेचे आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही कामे करायची आहेत.

तुम्हाला पैसे मिळणार की नाही? (PM Kisan Yojana Installment Status)

सर्वात आधी पीएम किसानच्या pmkisan.gov.in वेबसाइटर जायचे आहे.

यानंतर बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करायचे आहे.

यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या मागच्या हप्त्याची माहिती आणि पुढच्या हप्त्याचा स्टेट्‍स कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT