PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; या शेतकऱ्यांना मिळणार नाही ₹२०००

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २२वा हप्ता जमा केला जाऊ शकतो.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत अपडेट

२२वा हप्ता कधी येणार?

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता

पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये कधी जमा होणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र, आता फेब्रुवारी महिना संपत आला आहे तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० कधीही येऊ शकतात; त्याआधी हे काम कराच, अन्यथा...

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी मिळणार? (PM Kisan Yojana 22nd Installment Date)

मागच्या तीन वर्षांपासून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसानचा हप्ता जमा केला जात होता. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात होते. यावर्षीही आता शेवटच्या आठवड्यात पैसे येणार की नाही याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा करण्यात आला होता.यानंतर आता या आठवड्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ३० लाख शेतकऱ्यांना झटका, ₹२००० झाले बंद; पीएम किसान योजनेतून वगळले, कारण काय?

या शेतकऱ्याना मिळणार नाही पैसे (PM Kisan Yojana These Farmers will Not Get 2000 Rupees)

पीएम किसान योजनेचा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नावावर जमीन रजिस्टर आहे. जर एखादा शेतकरी दुसऱ्याच्या शेतात काम करत असेल. त्याच्या नावावर जमीन नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. याचसोबत पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, आता तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार की नाहीत याबाबतचा स्टेट्‍स तुम्हाला वेबसाइटवर दिसणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com