Check EPF Account yandex
बिझनेस

How To Check PF: तुमची कंपनी खरचं तुमच्या पीएफ खात्यात पैसे टाकतेय का? कसं समजेल?

Check PF Account : नोकरी लागल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोक्यात येणारा विषय म्हणजे कंपनी पीएफ किती रुपयांचा कपात करते.

Bharat Jadhav

How To Check PF Know The Details in Marathi:

नवीन ठिकाणी नोकरी सुरू केली तर एचआर तुम्हाला तुमच्या पगाराचं पूर्ण स्वरुप सांगत असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पीएफमध्ये टाकले जाणारे पैसे. तुमची कंपनी तुमच्या पगारातून किती पैसे पीएफसाठी कापते आणि कंपनीचा त्यात सहभाग किती हे जाणून घेणं आवश्यक आहे. कंपनी दर महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजेच पीएफ म्हणून तुमच्या पगारातून पैसे कापत असते. या पीएफच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर काही वार्षिक व्याज देखील मिळत असते.

कोणत्याही कर्मचाऱ्याचा बेसिक पे आणि डीएचा १२ टक्के भाग पीएफ खात्यात जमा केला जातो. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात १२ टक्के योगदान दिलं जातं. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात १२ टक्के योगदान दिलं जातं. कंपनी सहभागातून ३.३७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात क्रेडिट केली जाते. तर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये जमा केले जातात.

किती पैसे आले कसं कराल चेक

यासाठी तुमच्या ईपीएफ खात्याचं पासबूक तपासावं लागेल. पैसे कधी आणि किती जमा केले याचा तपशील तुमच्या पासबूकमध्ये असेल. तुम्ही ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन हे तपासता येईल. यासाठी खालील स्टेप्स पाहा.

  • आधी ईपीएफओ पोर्टल https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (Universal Account Number) सक्रीय करावा लागेल.

  • साईट ओपन झाल्यानंतर our services टॅबवर जावे लागेल. त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनमधून For Employees हा पर्याय निवडावा लागेल.

  • सर्व्हिस कॉलमखाली तुम्हाला मेबर पासबूक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला युएएन आणि पासवर्ड एन्टर करावा लागेल.

  • लॉग इननंतर मेंबर आयटी टाका. त्यानंतर EPF Balance दिसेल. यामध्ये तुम्हाला खात्यातील शिल्लक, सर्व ठेवींचे तपशील, एस्टॅबलिशमेंट आयटी, मेंब आयडी, कंपनीचं नाव, कर्मचाऱ्याचा योगदान आणि कंपनी किती पैसे टाकते याची माहिती असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT