PM Pik Vima Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरू

Pm Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरू
Pradhan Mantri PM Pik Vima Scheme Explained in Marathi
Pradhan Mantri PM Pik Vima Scheme Explained in MarathiSaam TV
Published On

Pradhan Mantri (PM) Pik Vima Scheme:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप सुरू झालं आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''राज्यात आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे.''

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pradhan Mantri PM Pik Vima Scheme Explained in Marathi
MSCC Saving Scheme: सरकारची महिलांसाठी खास योजना; हजार रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा अधिकचा परतवा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पर्जन्यमान आणि पीक पेरणी :

राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे.

Pradhan Mantri PM Pik Vima Scheme Explained in Marathi
#shorts : Government Scheme : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा मिळणार

गतवर्षी याच सुमारास 13 लाख 50 हेक्टर पेरणी झाली होती. या वर्षी 15 लाख 11 हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 26 टक्के पेरणी झाली आहे.

Pradhan Mantri PM Pik Vima Scheme Explained in Marathi
Manoj Jarange Patil: 'आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही येऊ नका', जरांगे पाटील यांचा भुजबळांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com