आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती आहे. अनेक शहरात मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम कार्यक्रम केलं जात आहेत. बिरसा मुंडा यांचा जन्म हा १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहाटू येथील खुंटी येथे झाला होता. ते मुंडा जमातीतील शूर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना धरती आबा म्हणूनही ओळखलं जातं. बिरसा मुंडा यांनी मुंडा समाजाच्या लोकांना पाणी, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी त्याग करण्याची प्रेरणा दिली. (Latest News)
त्याचं काम पाहून त्यांच्या नावावर शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान दिलं जातं. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या योजनेतून काय मिळतो लाभ
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, इनवेल बोअरिंग आणि पंपसंच, वीजजोडणी तसेच सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत तुषार संच किंवा ठिबक सिंचन संच, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप्स यासाठी अनुदान दिलं जातं. या योजनेत नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिलं जातं.
त्याचप्रमाणे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख, इनवेल बोअरिंग आणि पंपसंचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, वीजजोडणी आकार १० हजार रुपये दिले जात असतात. सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत तुषार संच २५ हजार रुपये किंवा ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपये, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप्ससाठी ३० हजार रुपये अनुदान दिलं जातं.
असा करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in अधिकृत वेबसाईट सुरू करा.
तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा भेट देत असाल तर तुम्हाला आधी तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल.
या वेबसाईटच्या उजव्या बाजूला नवीन नोंदणी या पर्यायात जाऊन तेथे तुम्हाला तुमचं नाव आणि इतर माहिती भरावी लागेल.
यूजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल.
युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला लॉगिन करा.
त्यानंतर मेन डॅशबोर्डवर ओपन झाल्यानंतर सर्च बॉक्समध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा पर्याय शोधा.
योजनेचं नाव दिसताच त्या रिजल्टवर क्लिक करा.
यानंतर नवीन एक पेज ओपन होईल. तेथे योजनेची सर्व माहिती आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती दिली जाईल.
यानंतर Apply Now किंवा अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.
परत एक नवीन पेज ओपन होईल, तेथे योजनेचा अर्ज दिसेल.
यात तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. म्हणजेच नाव, पत्ता आदी.
त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा. अर्ज करण्यासाठीची फी देखील भरावी लागेल.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावे लागेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहे पात्रता
लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा (ST)शेतकरी असणं गरजेचं आहे.
लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
लाभार्थीकडे शेतजमिनीचा सातबारा व आठ-अ असणं गरजेचं आहे.
लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक. तर हे बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न असणं गरजेचे आहे.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये १५०००० पेक्षा जास्त नसावे.
जर शेतकऱ्याला नवीन विहीर करायची असेल तर शेतकऱ्याकडे किमान एक एकर (०.४० हेक्टर) आणि नवीन विहीर खोदणे हा घटक वगळून योजनेतील अन्य घटकांसाठी किमान अर्धा एकर (०.२० हेक्टर) शेत जमीन असणे आवश्यक आहे.
या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी कमाल शेत जमीन मर्यादा ६.०० हेक्टर एवढी राहील. तर ०. ४० हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असेल तर दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन त्यांची एकत्रित जमीन आवश्यक जमिनी इतकी होत असेल तर त्यांना लिहून द्यावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.