Gold Harvest Scheme : सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत? पण एकरकमी पैसे देऊ शकत नाहीत? मग ही योजना आहे खास

What Is Gold Harvest Scheme : बरेचदा इच्छा असतानाही सोनं खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे देता येत नाही. अशावेळी अनेकांना ते विकत घेणे फार कठीण जाते
Gold Harvest Scheme
Gold Harvest SchemeSaam Tv
Published On

Gold Harvest Scheme Rules :

भारतात सोनं खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. सणासुदीच्या काळात सोन्याला विशेष मान आहे. सध्या देशात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. परंतु, हल्ली सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे कमीच आहे.

बरेचदा इच्छा असतानाही सोनं खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे देता येत नाही. अशावेळी अनेकांना ते विकत घेणे फार कठीण जाते. हा त्रास कमी करण्यासाठी अनेक ज्वेलर्सनी ग्राहकांसाठी गोल्ड हार्वेस्ट स्कीम आणली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या योजनेत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एकरकमी रक्कम भरावी लागणार नाही. यासोबतच यामध्ये मेकिंग चार्जमध्ये सूट आणि इतर अनेक सवलतींचा लाभ मिळू शकतो. ही योजना काय आहे जाणून घेऊया.

Gold Harvest Scheme
How To Check PF: तुमची कंपनी खरचं तुमच्या पीएफ खात्यात पैसे टाकतेय का? कसं समजेल?

1. गोल्ड हार्वेस्ट योजना काय आहे?

गोल्ड हार्वेस्ट स्कीम ही सोन्याची बचत करणारी योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम (Price) भरावी लागेल. १० महिन्यांनंतर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ज्वेलर्सकडे जमा होते. या गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा देखील देण्यात येते. या योजनेमध्ये तुम्ही १० ते १२ महिने गुंतवणूक करु शकता.

या योजनेवर ज्वेलर्स मेकिंग चार्जेसवर सूट आणि बोनसचा लाभही मिळतो. तनिष्कच्या वेबसाइटनुसार गोल्ड (Gold) हार्वेस्ट स्किममध्ये ग्राहकाला दरमहिन्याला दहा हजार रुपये जमा करावे लागतील. १० महिन्यानंतर ही रक्कम लाख रुपयांपर्यंत असेल. या रकमेवर तनिष्क ७,५०० रुपयांचा परतावा देईल. म्हणजेच तुमच्या एकूण रकमेत वाढ होईल.

Gold Harvest Scheme
Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

2. गोल्ड हार्वेस्ट योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे

  • या योजनेत गुंतवणूक (Investment) केल्यानंतर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी एकत्र रक्कम भरावी लागणार नाही.

  • या योजनेतून तुम्ही वर्षातून एकदाच सोने खरेदी करु शकता.

  • सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ती सहज करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com