Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate 10th July 2024: आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाचे नवे दर जाहीर होत असतात. यावरुनच पेट्रोल डिझेलचे भाव निश्चित केले जातात. आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत.

Siddhi Hande

देशात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही. परंतु सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमती १.५० रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे वाहनधारकांची चिंता आता वाढल्याचे दिसत आहे.

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ८६.३९ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइलची किंमत ८२.८६ डॉलर आहे. याचाच परिणाम राज्यातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होतो. जाणून घेऊया पेट्रोल- डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०३.४४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलची किंमत

पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.५३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०४ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.१२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.३६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.८७ रुपये प्रति लिटर आहे.अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.६२ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT