Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

jaggery and tulsi for lungs: फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी गूळ आणि तुळशीच्या सेवनाबाबत अनेक गैरसमज आणि दावे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या घरगुती उपायामागील वैज्ञानिक सत्य काय आहे.
DOES EATING JAGGERY AND TULSI STRENGTHEN YOUR LUNGS?
DOES EATING JAGGERY AND TULSI STRENGTHEN YOUR LUNGS?saam tv
Published On: 

गुळ हा भारतीय आहार आणि घरगुती उपायांचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गुळाचे सेवन केल्याने गळा स्वच्छ होण्यास, खोकला कमी होण्यास आणि श्वास घेण्यास आराम मिळण्यास मदत होते, असे मानले जाते. याशिवाय, तुळशीला देखील फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु, गुळ आणि तुळशीचे एकत्रीत सेवन केल्याने खरोखरच फुफ्फुसे साफ होतात का?

गुळामध्ये कोणते गुणधर्म असतात

गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स थोडेफार प्रमाणात आढळतात. काही लोकांना गुळ खाल्ल्याने कफ आणि गळ्यातील जळजळपासून आराम मिळाल्याचे जाणवते. तथापि, गुळ हा साखरेचाच एक प्रकार आहे आणि त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

DOES EATING JAGGERY AND TULSI STRENGTHEN YOUR LUNGS?
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

तुळशीत कोणते गुणधर्म असतात

पारंपरिक उपचारांमध्ये तुळशीचा वापर खुप आधीपासून केला जात आहे. खोकला, सर्दी आणि श्वासच्छ्वास संबंधित समस्यांमध्ये याचा वापर होतो. तुळशीमध्ये जळजळ कमी करणारे, संसर्गाशी लढणारे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. काही अभ्यासांमध्ये तुळशीच्या सेवनामुळे श्वासनलिकेला आराम मिळणे, छातीत साचलेला कफ कमी होणे आणि श्वास घेणे सोपे होणे यांसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत.

गुळ आणि तुळशीचे सेवन केल्याने फुफ्फुसे साफ होतात का?

डॉक्टरांच्या मते, गुळ किंवा तुळशीचे सेवन केल्याने फुफ्फुसे डिटॉक्स होतात किंवा त्यात साचलेले प्रदूषक कण बाहेर पडतात, हा एक गैरसमज आहे. गुळ किंवा तुळशीमुळे फुफ्फुसे साफ होऊ शकतात किंवा वायुप्रदूशनामुळे झालेला त्रास भरून निघू शकतो, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे अस्तित्वात नाहीत. जरी तुळशीमध्ये काही फायदेशीर घटक आणि गुळामध्ये खनिजे असली, तरी ते शरीराला अतिसूक्ष्म विषारी प्रदूषण कणांपासून वाचवणारे संरक्षक कवच म्हणून काम करत नाहीत.

DOES EATING JAGGERY AND TULSI STRENGTHEN YOUR LUNGS?
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

फुफ्फुसे स्वतः कशी सफाई करतात

आपल्या फुफ्फुसांमध्ये श्वासासोबत आत जाणाऱ्या कणांचा सामना करण्याची नैसर्गिक यंत्रणा असते. फुफ्फुसांमधील कफ आणि 'सिलिया' नावाचे बारीक केसांसारखे घटक श्वासावाटे गेलेले कण रोखण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करतात. मात्र, दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने शरीराची ही नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा कोलमडू शकते.

गुळ आणि तुळशी खाणे फायदेशीर नाही का?

गुळ आणि तुळशीचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता, परंतु त्यांना फुफ्फुसांची सफाई करण्याचा उपाय मानले जाऊ नये. यामुळे काही लोकांना गळ्याची जळजळ, सौम्य खोकला किंवा कफ यांसारख्या समस्यांमध्ये नक्कीच आराम मिळू शकतो, परंतु प्रदूशणाचे कण फुफ्फुसातून बाहेर काढण्याचे काम ते करत नाहीत.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.