Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Shreya Maskar

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर ठरते. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. नाचणीच्या पिठापासून तयार केलेला डोसा नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी खाता येतो.

lose weight | pinterest

नाचणी डोसा

नाचणी डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या फोडा.

Ragini Dosa | pinterest

भाज्या मिक्स करा

पिठात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. पीठ ५ मिनिटे बाजूला ठेवा. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार अनेक भाज्या टाकू शकता.

Fruits and vegetables | pinterest

डोसा पसरवा

नॉन-स्टिक तवा गरम करा. त्यावर थोडे तेल टाकून पळीभर पीठ गोलाकार पसरवून घ्या. नाचणीचे पीठ तव्यावर नीट पसरत नसेल, तर थोडे पाणी घाला.

Dosa | pinterest

कुरकुरीत डोसात तयार

मध्यम आचेवर डोसा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. तयार डोसा दह्यासोबत खाऊ शकता किंवा फक्त डोसा देखील चवीला स्वादिष्ट लागेल.

Prepared in crispy doses | pinterest

पोट भरल्याची भावना

नाचणीतील फायबर पचनक्रियेला मदत करते. संतुलित आहाराचा भाग म्हणून हा डोसा खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहून पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

A feeling of fullness | pinterest

कमी तेलाचा वापर

डोसा बनवताना कमी तेलाचा वापर करा. यामुळे अतिरिक्त कॅलरी कमी ठेवण्यास मदत होते. आठवड्यातून २-३ हा नाश्ता नक्की करा.

Low oil consumption | pinterest

इतर उपाय

वजन कमी करण्यासाठी डाएटसोबत व्यायाम, पुरेशी झोप, शाररिक हालचाल, मानसिक आरोग्य चांगले ठेवणे देखील गरजेचे आहे.

Lose weight | pinterest

NEXT : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

Upvasachi Lassi Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...