Shreya Maskar
नवरात्रीत उपवासाला काही तरी थंडगार प्यायचे वाटत असेल तर फक्त ५ मिनिटांत घरीच थंडगार उपवासाची लस्सी बनवा.
उपवासाची लस्सी बनवण्यासाठी ताजे घट्ट दही, साखर, थंड दूध , वेलची पूड, केशर, बर्फ आणि बदाम- पिस्ते इत्यादी साहित्य लागते.
उपवासाची लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये घट्ट दही घ्या. ते गुठळ्या न राहता गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या.
दह्यामध्ये साखर आणि वेलची पूड मिक्स करा. त्यानंतर साखर विरघळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित ढवळा. साखर तुमच्या आवडीनुसार टाका.
तयार मिश्रणात थोडे थंड दूध घालून मिक्सरमध्ये काही सेकंद फिरवा. लस्सी जास्त पातळ किंवा घट्ट करू नका.
तयार लस्सीमध्ये बदाम, पिस्ताचे काप टाका. तुम्ही यात केशरही टाकू शकता. यामुळे लस्सीचा रंग आणि चव आणखी वाढते.
अधिक क्रीमी चव हवी असल्यास दह्याचे प्रमाण वाढवा. साखरेऐवजी गोडपणासाठी खजूर वापरू शकता, मात्र त्यानुसार चव आणि घट्टपणा बदलेल.
लस्सी बनवल्यानंतर लगेच प्या. उन्हात किंवा खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवू नका. ऑक्टोबर हीटमध्ये थंडगार लस्सी प्यायल्यावर पोटाला आराम मिळेल.