Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

Shreya Maskar

नवरात्री

नवरात्रीत उपवासाला आवर्जून कुरकुरीत साबुदाणा वडा बनवा. उपवासाचा साबुदाणा वडा अनेकांना आवडतो आणि तो बनवायला देखील सोपा असतो.

Navratri | pinterest

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणा, उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर ,सैंधव मीठ, तेल आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Sago Vada | pinterest

साबुदाणा भिजवून घ्या

साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यातील पाणी काढा. साबुदाणा पाण्यात साधारण ४–६ तास ठेवा. दाणे मऊ असावेत, पण पाण्यात तरंगत नसावेत. तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर फक्त काही मिनिटे साबुदाणा गरम पाण्यात ठेवा.

Soak the sago | pinterest

शेंगदाण्याचा कूट

भिजवलेल्या साबुदाण्यात मॅश केलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरची, जिरे, कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. मिश्रणाचे समान गोळे करून हलके चपटे वडे बनवा.

Peanut butter | pinterest

वडे तळून घ्या

पॅनमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात साबुदाणा वडा गोल्डन फ्राय करा. एकदम अनेक वडे टाकू नका. तयार वडे टिश्यू पेपरवर काढा.

Fry the vada | pinterest

गरमागरम सर्व्ह करा

गरमागरम आणि कुरकुरीत साबुदाणा वडा दही किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Serve hot | pinterest

टिप १

साबुदाण्यात जास्त पाणी राहिल्यास मिश्रण सैल होऊ शकते. मिश्रण घट्ट होण्यास आणि वड्यांना चांगला पोत मिळण्यास शेंगदाण्याचे कूट वापरा.

Tip 1 | pinterest

टिप २

गरम बटाटे वापरल्यास मिश्रण जास्त मऊ होऊ शकते.तेल खूप थंड असल्यास वडे जास्त तेल शोषू शकतात. तसेच खूप गरम असल्यास बाहेरून लवकर तपकिरी होऊन आतून नीट शिजणार नाहीत. त्यामुळे तेलाचे तापमान योग्य असावे.

Tip 2 | pinterest

NEXT : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Kuttu Flour Puri Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...