Shreya Maskar
नवरात्रीच्या उपवासासाठी काहीतरी चविष्ट आणि पोट भरेल असे बनवायचे असेल तर कुट्टूच्या पिठाची पुरी नक्की ट्राय करा.
कुट्टूच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी कुटूचे पीठ, उकडलेला बटाटा, सैंधव मीठ, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
कुट्टूच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कुट्टूचे पीठ, उकडलेला बटाटा आणि चवीनुसार सैंधव मीठ घाला.
बटाटा व्यवस्थित मॅश करून मिश्रण एकत्र करा. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा.
पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिक शीट किंवा बटर पेपरच्या मदतीने जाडसर पुऱ्या थापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळा. पुऱ्या फुगण्यासाठी गरम तेलात हलकेच दाब द्या. अशाप्रकारे कुट्टूच्या पिठाची पुरी तयार झाली.
तयार पुऱ्या जिरे-बटाट्याची उपवासाची भाजी, दही किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत सर्व्ह करा.
पीठ खूप सैल मळू नका, अन्यथा पुऱ्या लाटताना तुटू शकतात. पुऱ्या खूप पातळ लाटू नका. तेल पुरेसे गरम झाल्यावरच पुरी तळा. बटाटा घातल्यामुळे पीठ बांधून राहण्यास मदत होते.