Shreya Maskar
नवरात्रीत उपवासाला रताळ्याचा शिरा बनवा. रताळ्याचा नैसर्गिक गोडवा, तुपाचा सुगंध आणि सुकामेव्याची चव यामुळे हा पदार्थ अधिकच चवदार लागेल.
रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी रताळी, साजूक तूप, साखर, दूध, काजू-बदामाचे काप, वेलची पूड आणि मनुके इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम छोटी रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची साल काढून कुस्करून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुके घाला. ते हलके भाजून एका बाजूला काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये कुस्करलेली रताळी घालून मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे परतून घ्या.
आता मिश्रणात साखर, दूध घालून सतत ढवळा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर वेलची पूड घाला. त्यानंतर थोड्या वेळाने भाजलेला सुकामेवा घाला. अशाप्रकारे गरमागरम शिरा तयार झाला आहे.
रताळ्याचा नैसर्गिक गोडवा लक्षात घेऊन साखर कमी-जास्त करा. शिरा अधिक मऊ आणि स्वादिष्ट होण्यासाठी थोडे अतिरिक्त तूप घालू शकता.
दूध न वापरता पाण्याचा वापर केल्यासही शिरा छान बनतो. फक्त पाण्याचे आणि दुधाचे प्रमाण योग्य ठेवा.
रताळ्याची खीर, रताळ्याची चाट, रताळ्याचे काप , रताळ्याचे पराठे, रताळ्याचे कटलेट देखील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.