Ducati ने लॉन्च केली सर्वात महागडी बाईक, याच्या किंमतीत येईल 4 मारुती कार; जाणून घ्या किंमत

Hypermotard 698 Mono: डुकाटीने आपली नवीन बाईक Hypermotard 698 Mono भारतात लॉन्च केली आहे. सिंगल सिलेंडर इंजिन असलेली ही जगातील सर्वात पॉवरफुल बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Ducati ने लॉन्च केली सर्वात महागडी बाईक, याच्या किंमतीत येईल 4 मारुती कार; जाणून घ्या किंमत
Hypermotard 698 MonoSaam Tv

इटलीची प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी डुकाटीने आपली नवीन बाईक Hypermotard 698 Mono भारतात लॉन्च केली आहे. सिंगल सिलेंडर इंजिन असलेली ही जगातील सर्वात पॉवरफुल बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे. बाईकची डिझाइन थोडी वेगळी आहे.

बाईकमध्ये 12 लीटरची पेट्रोल टाकी आहे. तुम्ही याला स्पोर्ट्स बाईक ही म्हणू शकता. ही बाईक दिसायला खूपच आकर्षक आहे यातच या बाईकचे फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Ducati ने लॉन्च केली सर्वात महागडी बाईक, याच्या किंमतीत येईल 4 मारुती कार; जाणून घ्या किंमत
Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?

Ducati च्या नवीन Hypermotard 698 Mono मध्ये 659cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 77.5PS ची पॉवर आणि 63 Nm टॉर्क जनरेट करतं . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व बाईक्सपैकी तुम्हाला या बाईकमध्ये सर्वाधिक पॉवर मिळेल. या बाईकमध्ये स्पोर्ट्स, अर्बन, वेट रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये ॲल्युमिनियम हँडलबार देण्यात आला आहे, ज्यामुळे या बाईकला स्पोर्टी फील मिळते.

यात Y आकाराचे 5 स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. यात डबल सी-एलईडी हेडलाइट आहे. यात फ्लॅट आणि उंच सीट आहे. याशिवाय बाईकमध्ये हाय फ्रंट मडगार्ड देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या बाईकमध्ये कॉर्नरिंग अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी विली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल, डुकाटी पॉवर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Ducati ने लॉन्च केली सर्वात महागडी बाईक, याच्या किंमतीत येईल 4 मारुती कार; जाणून घ्या किंमत
Mercedes Benz EQA: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई 4 वेळा पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह मर्सिडीजची सर्वात स्वस्त EV लाँच

किती आहे किंमत?

नवीन Hypermotard 698 Mono बाईकची एक्स-शोरूम किंमत 16.50 लाख रुपये आहे. डुकाटीने ही बाईक आपल्या क्लासिक लाल रंगात सादर केली आहे. याबीनची डिलिव्हरी जुलै 2024 च्या अखेरीस सुरु होईल. ही एक हाय परफॉर्मन्स बाईक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com