Bajaj Freedom 125 : जगातील पहिली CNG बाईक भारतात लॉन्च; १२५ CC इंजिन, ३३०km अॅव्हरेज

Bajaj Freedom 125 launched : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बजाज ऑटोने बजाज फ्रीडम 125 ही जगातील पहिली CNG बाईक लॉन्च केली आहे.
Bajaj Freedom 125
Bajaj Freedom 125Saam Digital
Published On

बजाज ऑटोने जगातील पहिली CNG मोटरसायकल भारतीय बाजारात आणली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बजाज फ्रीडम 125, भारतात लॉन्च करण्यात आली. या मोटरसायकलची किंमत 95,000 रुपये असून पेट्रोलवरसोबत CNG वर देखील चालू शकणार आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक असणार आहे आणि इंधन देखील बचत होणार आहे.

नितीन गडकरी यांनी या मोटरसायकलला गेम चेंजर असं म्हटलं आहे. एकदा टाकी फूल केली तर ही बाईक 330km पर्यंत जाते. मोटरसायकलमध्ये दोन इंधन टाक्या असून पेट्रोल आणि CNG वर चालणारी दुचाकी आहे. एक पेट्रोल टाकी आणि दुसरी CNG टाकी. त्यामुळे ग्राहकांना दोन्ही इंधन प्रकारांचा वापर करून इंधन बचत करता येणार आहे. प्रदूषणही टाळता येणार आहे.

इंधन खर्चात बचत

बजाज ऑटोच्या मते, फ्रीडम 125 मध्ये CNG चा वापर केल्यामुळे इंधन खर्चात 60 टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते. CNG बजाज फ्रीडम 125 मोटरसायकल आधुनिक डिझाइन असलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. डिजिटल मीटर, एलईडी हेडलाइट, आणि आरामदायी आसन यांसारख्या आधुनिक सुविधांचा आहेत. या मॉडेलची निर्मिती ग्राहकांच्या गरजांचा विचार करूनच करण्यात आली आहे.

Bajaj Freedom 125
Modi Government: कार्यकाळ होण्याआधीच मोदी सरकार कोसळणार? विरोधी पक्षातील नेत्याच्या दाव्यानं दिल्लीच्या राजकारणात खळबळ

अन्य दुकाकी कंपन्यांसाठी आव्हान

बजाज ऑटोच्या बजाज फ्रीडम 125 मॉडेल भारतात लॉन्च केल्यामुळे. भारतातील अन्य दुचाकी कंपन्यासाठी अन्य कंपन्यांसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. बाजारात नवीन स्पर्धा निर्माण होणार आहे. मात्र जशी स्पर्धा वाढली तरी बजाज ऑटोचे हे नवीन तंत्रज्ञान इतर कंपन्यांसाठी आदर्श ठरू शकेल.

Bajaj Freedom 125
Devendra Fadnavis On Rohit Sharma : रोहित शर्माने आनंदही दिला अन् दु:खही; सत्कार समारंभात देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com