Modi Government: कार्यकाळ होण्याआधीच मोदी सरकार कोसळणार? विरोधी पक्षातील नेत्याच्या दाव्यानं दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Lalu Prasad Yadav: बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी मोठा दावा केलाय. मोदी सरकार कधी कोसळणार याची तारीख त्यांनी सांगितलीय. लालू यादव यांच्या या दाव्याने दिल्लीत राजकीय खळबळ उडालीय.
Modi Government: कार्यकाळ होण्याआधीच मोदी सरकार कोसळणार?  विरोधी पक्षातील नेत्याच्या दाव्यानं  दिल्लीच्या राजकारणात खळबळ
Modi GovernmentRediff

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. यावर्षाच्या ऑगस्टनंतर मोदी सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी लालू प्रसाद यांनी केलीय. पंतप्रधान मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नसल्याचं तेजस्वी यादव म्हणालेत. हे दोन्ही नेते राजदच्या २८व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते.

राजदला पुढे नेण्याची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्यावर आहे. ही जबाबदारी ते पार पाडतील आणि आरजेडी पक्ष आपल्या विचारसरणीवर चालेल, असं लालू प्रसाद म्हणालेत. त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारची भविष्यवाणी केलीय. मोदी सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीये.

लोकसभा निवडणुकीत बिहारमधील महाआघाडीच्या खासदारांची संख्या आठ-दहाने वाढली असती तर मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते, असा दावाही लालू प्रसाद यादव यांनी केलाय. मोदींना कोणीही हरवू शकत नाही, असा अपप्रचार करण्यात आला. मोदींची तिसरी टर्म त्यांच्या मागील दोन टर्मपेक्षा खूपच कमकुवत आहे. मोदींना संसदेत जोरदार विरोध होतोय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल दु:ख करण्याची गरज नसल्याचं लालू यादव म्हणालेत.

तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आपल्या भाषणात विधानसभेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यात. आपल्याला पुढील लढाईसाठी सज्ज राहावे लागेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. दल बदलू आणि आरजेडीवर संशयास्पद विश्वास असलेल्या लोकांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याचं तेजस्वी यादव म्हणाले. तिकीट देताना विजय आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात ठेवली जाईल. उमेदवाराची स्वतःची ताकद तपासली जाणार असल्याचं, तेजस्वी यादव म्हणालेत.

यावेळी आम्ही विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात येईल. आम्ही सर्वात कठोर निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीला १६ विधानसभा जागांवर आघाडी मिळाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अशा विधानसभा मतदारसंघांची संख्या ७८- ८० आहे. आम्ही नोकरी दिलीय. बिहारमधील तरुण, जात-धर्माचा विचार न करता आमच्या पक्षाला मतदान करतील, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलाय.

Modi Government: कार्यकाळ होण्याआधीच मोदी सरकार कोसळणार?  विरोधी पक्षातील नेत्याच्या दाव्यानं  दिल्लीच्या राजकारणात खळबळ
PM Narendra Modi Speech: 'खोटं पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही', विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर PM मोदींचा टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com