Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?

Upcoming CNG Cars: भारत वाहन बाजारात लवकरच Tata, Maruti आणि Hyundai च्या नवीन सीएनजी कार्स लॉन्च होणार आहे. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?
Upcoming CNG CarsSaam Tv

भारतीय वाहन बाजारात सीएनजी कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. यातच आता काही नवीन सीएनजी मॉडेल्स लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या नवीन मॉडेल्समध्ये बूट स्पेस सुधारण्यासाठी दोन सीएनजी सिलिंडर बसवले जात आहेत. तसेच आगामी काळात टर्बो पेट्रोल इंजिन आणि एएमटी गिअरबॉक्सची सुविधा सीएनजी कारमध्येही पाहायला मिळणार आहे. कोणते मॉडेल्स बाजारात लॉन्च होणार आहेत, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Hyundai Duo Cylinder CNG

Hyundai Motor India आपल्या CNG कारमध्ये “Hy-CNG Duo” तंत्रज्ञान वापरणार आहे. म्हणजे गाड्यांमध्ये दोन छोटे सीएनजी सिलिंडर बसवले जातील. हेच तंत्रज्ञान सध्या टाटा मोटर्सच्या सीएनजी कारमध्ये पाहायला मिळतं. Hyundai कडे सध्या Aura, Exter आणि Grand i10 Nios सारख्या कार CNG किटसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?
Royal Enfield नवीन दमदार बाईक 17 जुलैला होणार लॉन्च, 452cc चे मिळणार इंजिन; किती असेल किंमत?

या सर्व गाड्या एकाच सिलिंडर किटसह येतात, ज्यामुळे बूटमध्ये जागा कमी होते. हेच लक्षात घेऊन या गाड्यांमध्ये लवकरच ट्विन-सिलेंडर सीएनजी किटचा समावेश करण्यात येणार आहे. Hy-CNG Duo तंत्रज्ञानाचा वापर i20 आणि Venue मध्ये देखील पाहायला मिळेल.

Tata Nexon iCNG

Tata Motors आपली नवीन Nexon iCNG कार या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करू शकते. ही भारतातील पहिली CNG SUV असेल. ज्यामध्ये टर्बोचार्जर इंजिन असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह देखील येऊ शकते. सेफ्टीसाठी, Nexon iCNG मध्ये 6 एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल असिस्ट, डिस्क ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा मिळू शकतो. आयसीएनजी बॅजिंग व्यतिरिक्त या कारच्या डिझाइनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचं पाहायला मिळणार नाही. याची संभाव्य किंमत 10.75 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?
Hyundai INSTER EV: मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार, Hyundai INSTER EV लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि Feature

Maruti Suzuki Dzire S-CNG

मारुतीच्या Dezire CNG ला भारतात खूप पसंती आहे. लवकरच कंपनी याचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेलच्या पुढील आणि मागील डिझाइनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. नवीन Dezire मध्ये फीचर्स देखील अपडेट केले जातील. पॉवरसाठी कारला Z सीरीजचे नवीन 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल.

सेफ्टीसाठी यात दोन एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि हिल असिस्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. नवीन Dezire यावर्षी सणासुदीच्या आधी लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत 7 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com