Hyundai INSTER EV: मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार, Hyundai INSTER EV लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि Feature

Hyundai INSTER EV Launched Know Price and Feature: Hyundai ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Hyundai INSTER लॉन्च केली आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर मुंबईत ते कोल्हापूर गाठू शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार,  Hyundai INSTER EV लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Hyundai INSTER EVSaam Tv

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने बुसान इंटरनॅशनल मोटर शोमध्ये आपली सब-कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV INSTER लॉन्च केली आहे. Hyundai ने हे नवीन मॉडेल A सेगमेंटमध्ये लॉन्च केले आहे. याची किंमत अजून उघड करण्यात आलेली नाही. मात्र याच्या फीचर्सची माहिती समोर आली आहे.

यामध्ये दोन बॅटरी पॅक मिळू शकतो. यात फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. याची स्पर्धा टाटा पंच इलेक्ट्रिक आणि एमजी कॉमेटशी होईल.

मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार,  Hyundai INSTER EV लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ather Manufacturing Plant : एथरचा तिसरा प्लांट छत्रपती संभाजीनगरमध्ये; २००० कोटी गुंतवले, ४ हजार तरुणांना मिळणार रोजगार

नवीन INSTER चे डिझाइन अतिशय बोल्ड ठेवलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश आणि हाय रेंज ऑफर करणारी इलेक्ट्रिक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. नवीन INSTER ची लांबी 3825mm, रुंदी 1610mm, उंची 1575mm आणि व्हीलबेस 2580mm आहे.

ग्राहकांना या कारमध्ये 10.25 इंच डिजिटल क्लस्टर आणि 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. जयामध्ये नेव्हिगेशन आणि वायरलेस चार्जिंगचा समावेश असेल. ही फाय सीटर कार आहे. यात 280 लीटरची बूट स्पेस असेल.

मुंबईत ते कोल्हापूर एका चार्जमध्ये गाठणार,  Hyundai INSTER EV लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Motorola S50 Neo: चार वर्षाच्या गॅरंटीवाला Moto S50 Neo लॉन्च; कॅमेरा पाहून म्हणाल Wow; जाणून घ्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स

नवीन INSTER मध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय असेल. याचा स्टँडर्ड 42kWh बॅटरी पॅकसह असेल, जो पूर्ण चार्ज केल्यावर 300 किलोमीटरची रेंज देईल. तर याचा 49kWh बॅटरी पॅक प्रकार 355 किलोमीटरची रेंज ऑफर करेल, असं बोललं जात आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता. ही कार 10-80% चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जरने फक्त 30 मिनिटे लागतील. दरम्यान, ही कार भारतात कधी लॉन्च होणार, याची किंमत किती असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com