Motorola S50 Neo: चार वर्षाच्या गॅरंटीवाला Moto S50 Neo लॉन्च; कॅमेरा पाहून म्हणाल Wow; जाणून घ्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स

Moto S50 Neo Phone Features, Camera Specification: स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. कंपनीने आपल्या चाहत्यांसाठी आणि ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन Moto S50 Neo लॉन्च केलाय.
Moto S50 Neo
Moto S50 Neogoogle

स्मार्टफोन कंपनी मोटोरोला नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. गेल्या काही महिन्यांत मोटोरोलाने अनेक स्मार्टफोन लॉन्च केलेत. आता Motorola चा नवीन स्मार्टफोन Moto S50 Neo लॉन्च करण्यात आलाय. लॉन्च होताच हा फोन खूप चर्चेत आलाय. मोटोचे चाहते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते.

मोटोरोलाने Moto S50 Neoला Moto Razr 50 च्या सीरिजसह बाजारात आणले आहे. जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर मोटो कंपनीचा हा फोन उत्तम पर्याय आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनच्या मार्केटमध्ये लॉन्च झालाय, पण लवकरच भारतीय बाजारातदेखील हा फोन आणला जाणार आहे. Moto S50 Neo हा जगातील असा फोन आहे, ज्या कंपनीने एक-दोन नाही तर थेट ४ वर्षाची गॅरंटी दिलीय. Moto S50 Neo मध्ये कंपनीने pOLED कर्व्ड डिस्प्ले दिलाय.

Motorola ने Moto S50 Neo तीन प्रकारांसह बाजारात आणला आहे. या मोबाईलचा पहिला प्रकार 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. याची किमत CNY च्या किमतीत ​​1,399 मिळतो, म्हणजेच भारतीय रुपयांनुसार हा फोन जवळपास Rs 16000 रुपयांमध्ये मिळेल. त्याचा दुसरा प्रकार 12GB RAM आणि 256GB सह येतो जो CNY ​​1,599 मध्ये म्हणजेच सुमारे 18,400 रुपयांना मिळेल. तर तिसऱ्या प्रकारचा फोन 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. कंपनीने ते CNY मध्ये 1,899 म्हणजेच सुमारे 21,800 रुपये किमत ठेवलीय.

Moto S50 Neo फीचर्स

Moto S50 Neo मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा पोलेडी डिस्प्ले दिलाय. जो वक्र डिझाइनसह येतो.

मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये कंपनीने 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 1600 nits अधिक ब्राइटनेस दिलाय.

Moto S50 Neo मध्ये कंपनीने Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर दिलाय. तुम्ही हा फोन मल्टी टास्किंगसाठी वापरू शकतात.

या स्मार्टफोनमध्ये Motorola ने 12GB रॅमसोबत 512GB पर्यंत स्टोरेज क्षमचा दिलीय.

स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. हा कॅमेरा 50MP सेन्सरसह येतो तर दुसरा कॅमेरा 8MP सह उपलब्ध आहे.

कंपनीने सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Moto S50 Neo मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिलाय.

Moto S50 Neo मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. यामध्ये कंपनीने 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आलाय.

Moto S50 Neo
OnePlus नंतर आता Redmiही आणणार 108MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या इतर फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com