Nashik Water Scarcity : दमदार पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा; प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Nashik News : एकीकडे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असला तरी नाशिक जिल्ह्यात हवा तेवढा पाऊस अद्यापपर्यंत झालेला नाही.
Water Tranker
Nashik Water ScarcitySaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदाचा उन्हाळा प्रचंड दाहकता देणारा ठरला आहे. तापमानाच्या बाबतीत आणि पाणी टंचाईच्या बाबतीत देखील. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईची भीषणता होती. दरम्यान पाऊस पाडल्यानंतर अनेक भागातील पाणी टंचाईची समस्या कमी झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत पाण्याची भीषणता जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करत तहान भागविली जात आहे. 

Water Tranker
Kalyan water Scarcity : पाण्यासाठी केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा

पावसाळा सुरु होऊन महिना उलटला असला तरी नाशिक (Nashik) जिल्ह्यात अद्यापपर्यंत पुरेसा असा दमदार पाऊस झालेला नाही. एकीकडे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असला तरी नाशिक जिल्ह्यात हवा तेवढा पाऊस अद्यापपर्यंत झालेला नाही. परिणामी पावसाळ्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईला (Water Scarcity) सामोरे जावे लागत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. चांगला पाऊस पडून पाणी टंचाईची समस्या कधी सुटणार याची प्रतीक्षा आता जिल्हा वासियांना आहे. 

Water Tranker
Kalyan Bribe Case : परवाना मंजूरीसाठी मेडिकल दुकानदाराकडे मागितले एक लाख; औषध निरीक्षकासह साथीदार ताब्यात

अजूनही २२८ टँकर सुरु 

पावसाअभावी पाण्याची समस्या अधिक निर्माण होत असते. उन्हाळ्यात पाणी टंचाई असलेल्या भागात चांगला पाऊस झाल्याने तेथील पाणी टंचाई संपली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पाण्याची समस्या कायम असून नाशिक जिल्ह्यात सध्या ९३५ गाववाड्यांना २२८ टँकरद्रवारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने टँकरने पाणी पुरवठाला जिल्हा प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com