अभिजित देशमुख
कल्याण : पावसाळा सुरु झाल्यानंतर देखील अनेक भागात अजूनही पाणी टंचाईची समस्या कायम आहे. हीच परिस्थिती कल्याणजवळील अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरात निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या सुटत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असून आज शिवसेनेने आज आंदोलन छेडले. थेट केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.
कल्याणजवळील (Kalyan) अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरात आजही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील नागरिक गेल्या वर्षभरापासून पाणी टंचाईने त्रस्त असून अनेकदा याबाबत निवेदन देऊन पाण्यासाठी आंदोलन केली आहेत. मात्र त्यानंतर देखील पाण्याची समस्या (Water Scarcity) सुटले;ली नाही. या भागातील महिला नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत जाते. याकडे केडीएमसी दुर्लक्ष करत आहे.
दरम्यान आज पाण्याच्या समस्येसाठी (Shiv Sena) शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. मोर्चा दरम्यान शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिक महापालिका कार्यालयाचे गेट उघडून थेट आत घुसले. अधिकाऱ्याच्या दालनात गोंधळ घालत अधिकाऱ्यांना पाणी टंचाई बाबत जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी या भागातील पाणी टंचाईवर दोन दिवसात मार्ग काढण्यात येईल; असं आश्वासन आंदोलनकर्त्याना दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.