Gokul Mahayuti power sharing formula : कोल्हापूरच्या प्रसिद्ध 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीमध्ये एक नवीन फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला?
राष्ट्रवादी काँग्रेस: २ वर्षे
शिवसेना (शिंदे गट): २ वर्षे
भारतीय जनता पक्ष (भाजप): १ वर्ष
गोकुळच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महायुती स्थापन केली होती. ज्याची जास्त ताकद आणि बार्गेरिंग पॉवर जास्त, त्याप्रमाणे पहिला अध्यक्ष ठरवण्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला होता. तिन्ही पक्ष महत्त्वाचे असल्यामुळे सुरुवातीची दोन वर्षे राष्ट्रवादीकडे, त्यानंतरची दोन वर्षे शिवसेनेकडे आणि शेवटचे एक वर्ष भाजपला अध्यक्षपद देण्याचा हा बेसिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, महायुतीचा पहिला अध्यक्ष निवडल्यानंतरच या फॉर्म्युलेटेड स्वरूपाला अधिकृत रूप दिले जाईल आणि त्यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.