PM-Kisan Samman Nidhi Yojana Update Explain in Marathi PM-Kisan Samman Nidhi Yojana Update Explain in Marathi- Saam Tv
बिझनेस

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार? लवकरच मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

PM Sanman Nidhi Money: सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजारांचा हप्ता दिला जाऊ शकतो.

कोमल दामुद्रे

Namo Shetkari Samman Nidhi Yojana Installment:

येत्या २०२४- २५ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरीचा हप्ता वाढवू शकते.

सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजारांचा हप्ता दिला जाऊ शकतो. वर्षभरात सन्मान निधी योजना ही तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातील. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारची (Governments) शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून (Farmer) करण्यात येत होती.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असतील. त्यामुळे मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी आर्थिक संकल्पनात बदल करतील अशी आशा ही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षीचा आर्थिक बजेटमधून (Budget) सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

1. या योजनेचा पात्रता काय?

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेसाठी पात्रत आहेत.

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

  • शेतकऱ्याकडे यासाठी स्वत:ची शेतजमीन असणे देखील आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT