Personal Loan Interest : पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय? या ५ बँका देताय कमी व्याजदरात कर्ज, जाणून घ्या लेटेस्ट रेट

Interest Rates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैयक्तिक कर्जाचे दर वाढवल्यानंतरही काही बँका कमी दरात कर्ज ऑफर करत आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल
Personal Loan Interest
Personal Loan InterestSaam Tv
Published On

List Of 5 Banks Offering Lowest Personal Loan:

नुकत्याच RBI ने जाहिर केलेल्या नियमांमध्ये पर्सनल लोन घेणे महागले आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पैशांची अधिक प्रमाणात चणचण भासू लागल्यास आपण जवळच्या व्यक्तीकडून घेतो किंवा बँकेतून लोन घेण्याचा विचार करतो.

अनेकदा लोक पर्सनल लोन घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी, वैद्यकीय परिस्थिती किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी कर्ज घेतात. परंतु, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैयक्तिक कर्जाचे दर वाढवल्यानंतरही काही बँका कमी दरात कर्ज ऑफर करत आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बँक ऑफ महाराष्ट्र

जर तुम्ही बँक (Bank) ऑफ महाराष्ट्रातून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला ८४ महिन्यांसाठी कालावधीसाठी १० टक्के ते १२.८० टक्के पर्यंत व्याज द्यावे लागेल. यामध्ये ग्राहकांना २० लाखांपर्यंतचे कर्ज (Loan) मिळेल. परंतु, यासाठी तुमचा CIBIL स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमचा CIBIL स्कोअर हा ८०० किंवा त्याहून अधिक असल्यास व्याजदर देखील मिळतो.

Personal Loan Interest
Personal Loan : पर्सनल लोन घेताना या ४ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नकाच, अन्यथा कर्ज फेडताना येईल नाकी नऊ

2. पंजाब सिंध बँक

जर तुम्ही पंजाब सिंध बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला १०.१५ टक्के ते १२.८० टक्के व्याजदर (Interest) भरावा लागेल. या व्याजदराचा कालावधी हा ६० महिन्यांसाठी असेल.

3. बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियामधून पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला १०.२५ टक्के किंवा त्याहून अधिक व्याज द्यावे लागेल. हा व्याजदर ८४ महिन्यांच्या कालावधीनुसार असणार आहे.

Personal Loan Interest
Garlic Chutney Recipe : झणझणीत अन् टेस्टी राजस्थानी लसणाची चटणी, पाहा रेसिपी

4. इंडसइंड बँक

इंडसइंड बँक ही ग्राहकांना ३० हजार किंवा २५ लाखाच्या वैयक्तिक कर्जावर १०.२५ टक्के ते ३२ टक्के व्याजदर आकारात आहे. हे व्याज फेडण्यासाठी १२ ते ६० महिन्याचा कालावधी आहे. यावर तुम्हाला ३ टक्के पर्यंत प्रोसेसिंग फी देखील भरावी लागेल.

5. बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदामधून तुम्हाला ५० हजार ते २० लाखांपर्यंतचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला १०.३५ टक्के ते १७. ५० टक्के व्याज द्यावे लागेल. या कर्जाचा कालावधी ४८ ते ६० महिन्यांपर्यंत असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com