Ladki Bahin Yojana May Installment google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडकींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana May Installment: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत लाखो महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून लाडक्या बहिणीचे हप्ता खात्यात जमा झाला नव्हता.त्यामुळे लाडक्या बहि‍णी मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करत होत्या. १५ जून रोजी संध्याकाळी लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या २ दिवसांत सर्व पात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता हा गेल्या महिन्यात आला होता. त्यामध्ये मार्च - एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता. तर या महिन्यात सरकारने मे महिन्याचा हप्ता जमा केला आहे. तर यामध्ये राज्यातल्या १ कोटी ७७ लाख महिलांना हप्ता पाठवण्यात येईल. याने सरकारचा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा उद्देश पूर्ण होईल. जर तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही पुढील पद्धतीने तपासू शकता. ही प्रोसेस अगदी सोपी आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा तपासायचा?

स्टेप १

सर्वात आधी बँक खातं अपडेट करा. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग किंवा ATM चे स्टेटमेंटचे व्यवहार तपासा. कारण जेव्हा हप्ता दिला येतो त्याचा एसएमएस पाठवला जातो.

स्टेप २

तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का ते तपासा. बँकेत जाऊन किंवा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चौकशी करा. कारण आधार सीडिंगमध्ये काही चूक असेल तर हप्ता अडकू शकतो.

स्टेप ३

तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा अॅपवर लॉगिन करा. अर्ज क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाईल नंबर वापरून स्टेटस तपासा. अर्ज "Approved", "Pending" किंवा "Rejected" आहे का तेही तपासा. अशा पद्धतीने तुम्ही लाडकीचा हप्ता तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT