Sakshi Sunil Jadhav
सध्या फिटनेसचा ट्रेंड सर्वच वयोगटातल्या मंडळीमध्ये सुरु आहे. पण त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सगळ्याच वयानुसार जीमला जाता येत नाही. काहींना कामामुळेही वेळ मिळत नाही. अशावेळेस चालणं हा बेस्ट पर्याय ठरू शकतो.
तुम्ही तुमच्या पन्नाशीत फिट राहणं पसंत करत असाल तर चालणं हा पर्याय निवडू शकता. त्याने तुमच्या अनेक समस्या कमी होतील.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर रोज चाललात तर तुमचं वजन नियंत्रणात राहतं, पचनक्रिया सुधारते, ब्लड प्रेशर आणि डायबेटीज सारख्या समस्या कंट्रोलमध्ये राहतात.
आता महत्वाचा प्रश्न आहे की, जर पन्नाशीतल्या व्यक्तीला आयुष्यभर फिट राहायचं असेल तर किती वेळ चाललं पाहिजे? चला जाणून घेऊयात.
तर पन्नाशीतल्या व्यक्तींनी फिट राहण्यासाठी ३० मिनिटं सलग चालणं महत्वाचं आहे. त्याने बऱ्याच समस्या कमी होतात.
जर पन्नासवर्ष असणाऱ्या व्यक्तीला सलग चालता येत नसेल तर १० ते १५ मिनिटं ते सलग चालू शकतात. ही सवय दिवसातून किमान २ - ३ वेळा तरी फॉलो केली पाहिजे.
तुम्ही किमान २० मिनिटं सलग चाललात तरी तुम्हाला परिणाम जाणवेल. हा फिट राहण्यासाठी एक सोपा व्यायाम आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.