यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. परंतु जर अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे दृष्टी नसेल तर विचारही करता येत नाहीये ना. परंतु दृष्टी नसतानाही रवि राजने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्याने स्वतः च्या मेहनतीने हे यश मिळवलं आहे. रवी राजने आपल्या आईच्या मदतीने हे यश मिळवलं आहे. त्याची आई त्याची दृष्टी बनली आहे.
बिहारच्या नवादा येथील रवि राजने यूपीएससी (UPSC) परीक्षेत १८२ रँक प्राप्त केली आहे. ते दिव्यांग असतानाही त्यांनी एवढे मोठे यश मिळवले आहे. आयुष्यात खूप अडचणी येतात. परंतु या अडचणींवर मात कशी करायची हे आपल्या हातात असते.रविच्या या यशात त्याची आई विभा सिन्हा यांनी खूप सपोर्ट केला.
रवी (IAS Ravi Raj) यांच्याकडे दृष्टी नव्हती. त्याची आई त्याची दृष्टी बनली. तिने त्याला अभ्यासासाठी मदत केली. रवीची आई त्याला वाचून आणि लिखाणासाठी मदत करायची. या आई मुलाचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. शारिरीक आणि मानसिक तणाव असतानाही त्यांनी यश मिळवले आहे.
आई-मुलाने रोज खूप पुस्तके वाचली. रवीची आई जेवण बनवताना त्यांना शिकवायची. त्यांना युट्यूबच्या मदतीने अभ्यास करायला मदत करायचे. रोज १० तास अभ्यास करायचे. आईच्या मदतीने त्याने यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आहे. रवीच्या आईने त्याला वाचन- लिखाणासाठी मदत केली. रवीसोबत त्या स्वतः देखील शिकल्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अशीच स्त्री रवी याच्यामागेदेखील उभी होती. रवीच्या मागे त्याची आई उभी आहे.या दोघांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.