
Vaibhav Suryavanshi IPL 2025: ३५ चेंडूत १०० धावा करणाऱ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये वैभवने काल वादळी खेळी केली. या कामगिरीनंतर वैभवने इतिहास रचत सर्वांना आश्चर्यचकीत केले. सचिन, रोहितपासून अनेक दिग्गज किक्रेटपटू लहानग्या वैभव सूर्यवंशीचे चाहते बनले आहेत. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शतकीय खेळीनंतर सूर्यवंशीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. २०२४ मधील भेटीचे फोटो शेअर करत नितीश कुमार यांनी वैभवला शुभेच्छा दिल्या.
वैभव सूर्यवंशी हा मुळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. आयपीएलमध्ये कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम वैभवने केला. त्यानंतर कालच्या (२८ एप्रिल) राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्यात त्याने ३८ चेंडूत १०१ धावा करत अनेक विक्रम मोडित काढले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक्सवर पोस्ट करत वैभवचे कौतुक केले.
'आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयामध्ये (१४ वर्ष) शतक ठोकणाऱ्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा! मेहनत, परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर तो भारतीय क्रिकेटसाठी नवी आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे. २०२४ मध्ये मी वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांना भेटलो होतो. त्यावेळी मी वैभवला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या', असे नितीश कुमार यांच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केलेले आहे.
'वैभवच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर मी त्याच्याशी फोनवर बोललो आणि त्याचे अभिनंदन देखील केले. बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचे मानधन दिले जाईल अशी मी घोषणा करतो. भविष्यात वैभवने भारतीय संघासाठी नवीन विक्रम प्रस्थापित करावेत आणि देशाला गौरव मिळवून द्यावा अशी मी आशा करतो', असे नितीश कुमार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.