Success Story : हाईटला फाईट देत आदिवासी तरुण झाला अधिकारी, नंदूरबारच्या विजयने गाठली BMCत अधिकारी पदाची उंची

Nandurbar News : नंदूरबाद जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विजय पावरा या आदिवासी तरुणाची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
Success story
Success storyX
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील विजय पावरा या आदिवासी तरुणाने मोठे यश संपादन केले आहे. परिस्थितीवर मात करत त्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रगती केली आहे. विजयची उंची फक्त ३ फूट आहे. मात्र याची अडसर त्याला कधीही ठरली नाही. जिद्दीने अभ्यास करत तो बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी बनला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव तालुक्यात विजय पावराचे गाव आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला विजय बालपणापासूनच अपंग आहे. त्याची उंची ही तीन फुटाची आहे. अपंगत्व आणि हालाखीची परिस्थिती यांवर मात करुन विजयने यश प्राप्त केले आहे. इतक्या कमी उंचीचा विजय पावरा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच अधिकारी ठरला आहे.

Success story
CSK च्या मिस्ट्री गर्लला विसराल अशी होती काव्या मारनची Reaction, नेमकं काय घडलं? Video Viral

मला माझ्या वाटचालीत कधीही माझ्या कमी उंचीमुळे न्यूनगंड वाटला नाही, कशाचीही भीती वाटली नाही. मी उंचीने कमी आहे याची कधीच स्वत:ला जाणीव करुन दिली नाही. मी नेहमी माझ्या अभ्यासावर भर दिला आणि यश माझ्या पदरात पडले. आज माझी निवड झाली आहे. मला अत्यंत आनंद होत आहे, असे वक्तव्य विजय पावराने केले आहे.

Success story
दादा भडकला; दहशतवादाला थारा नाही! सौरव गांगुलीने Ind vs Pak क्रिकेट मॅचवर स्पष्ट केली भूमिका

६ डिसेंबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक अधिकारी या पदासाठी परीक्षा झाली होती. विजय पावराने अभ्यास करुन ही परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल हाती आला असून महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक अधिकारी पदासाठी त्याची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Success story
हिच्यासाठी तरी जिंकायला हवं होतं... CSK चा पराभव पाहून अभिनेत्री ढसाढसा रडली, Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com