Whatsapp  SAAM TV
बिझनेस

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

Whatsapp Update: व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी झाला आहे.

Priya More

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास ३.५ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे नंबर लीक झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामागे कोणताही हॅकर नाही तर याला व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटाची चूक मानली जात आहे. असाही दावा केला जात आहे की, मेटाला ८ वर्षांपासून हे माहित होते परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरून नंबीर लीक होणे याकडे इतिहासातील सर्वात मोठे डेटा लीक म्हणून पाहिले जात आहे. मेटाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

वायर्डच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वियना यांच्या संशोधकांना व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक मोठी सुरक्षा त्रुटी आढळली. यामध्ये असे दिसून आले की कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे फोन नंबर सहजपणे काढू शकतात. ही त्रुटी इतकी सोपी आहे की त्यासाठी कोणत्याही मोठ्या हॅकिंगची आवश्यकता नाही. संशोधकांनी फक्त व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर केला आणि एकाच वेळी अब्जावधी नंबर टाकून तपासणी केली.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक सामान्य वैशिष्ट्य आहे जिथे तुम्ही एखाद्याचा नंबर एंटर करून ते व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत की नाही हे पाहता. जर ते असतील तर त्यांचा प्रोफाइल फोटो आणि नाव देखील दिसते. संशोधकांनी याच पद्धतीचा वापर केला. एकाच वेळी लाखो नंबर एंटर केले. यामुळे जगातील जवळजवळ प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे नंबर दिसून आले. त्यांनी सांगितले की, त्यांनी ५७ टक्के युजर्सचा प्रोफाइल फोटो आणि २९ टक्के युजर्सचा प्रोफाइल मजकूर देखील उघड केला.

आश्चर्याची बाब अशी आहे की, मेटाला २०१७ च्या सुरुवातीलाच या समस्येबद्दल माहिती होती. तेव्हा लोकांनी त्याबद्दल इशारा दिला होता पण कंपनीने अनेक वर्षे काहीही केले नाही. एप्रिल २०२५ मध्ये संशोधकांनी पुन्हा अहवाल दिला तेव्हा मेटाने ऑक्टोबरमध्ये एक उपाय काढला. आता एकाच वेळी अनेक नंबर एकाच वेळी टाकता येत नाहीत. प्रविष्ट करता येणार नाहीत. याला रेट लिमिट म्हटले जाते.

मेटाने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, उघड झालेला डेटा आधीच सार्वजनिक होता. याचा अर्थ असा की ज्यांचे प्रोफाइल फोटो आणि नाव लोकांना दिसत होते तेच उघड झाले. ज्यांच्याकडे प्रायव्हसी सेटिंग्ज होती त्यांच्यावर याचा परिणाम झाला नाही. कंपनीचे म्हणणे आहे की अद्याप कोणत्याही हॅकर्सनी या असुरक्षिततेचा फायदा घेतलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, विमानतळ बंद

Dry Skin Care: ड्राय स्किनला करा बाय बाय, अंघोळीनंतर करा 'हा' घरगुती सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

मंदिरात भेटायला बोलावलं, अपरहण करत हॉटेलवर नेलं; तरुणीवर गँगरेप करत....

Maharashtra Live News Update: कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला

Taj Mahal: सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

SCROLL FOR NEXT