गारपिटीचा मोठा तडाखा! डोळ्या देखत द्राक्षाचे नुकसान, बळीराजाच्या डोळ्यात अश्रु|VIDEO

Unseasonal Rain Impact On Grape Farmers Maharashtra: सांगलीच्या मिरज पूर्व भागात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगलीच्या मिरज पूर्व भागामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.. त्यामुळे मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेडग मालगाव रस्त्यावरील द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला एक्सपोर्टचा द्राक्ष हा अक्षरशः तुटून जमिनीवर पडलेला आहे. गारांचा एवढा मारा होता की बागेची पानं आणि द्राक्ष तुटून जमिनीवर पडले आहेत. जमिनीवर पानांचा आणि द्राक्षांचा खच साचून राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मिरज तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com