Whatsapp
WhatsappSaam TV

Whatsapp चं नवं फीचर! आता चॅट बॅकअपसह प्रायव्हेट मेसेज अन् व्हिडिओ राहणार सुरक्षित; आताच करा हे काम

Whatsapp New Passkey Feature: व्हॉट्सअॅपने नवीन पासकी फीचर लाँच केले आहे. यामुळे तुमचे चॅट बॅकअप एकदम सुरक्षित राहणार आहे. याचसोबत एंड टू एंड एन्क्रिप्शनमधीलही मेसेज आणि व्हिडिओ फक्त तुम्हालाच दिसणार आहेत.
Published on
Summary

Whatsappचंनवीन Passkey फीचर

तुमचं चॅट बॅकअप होणार आणखी सुरक्षित

पास-की फीचर कसं वापरायचं?

जगातील कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅप वापरतात. व्हॉट्सअॅपमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. तुम्ही काही सेकंदातच जगातील कोणत्याही कोपऱ्यात मेसेज पाठवू शकतात. दरम्यान, व्हॉट्सअॅप नेहमीच वेगवेगळे फीचर लाँच करत असते. ज्यामुळे युजर्संना खूप फायदा होतो. व्हॉट्सअॅपने नुकतेच एक पासकी-बेस्ड एन्क्रिप्शन सुरु केले आहे. यामुळे तुमची चॅट हिस्ट्री अजूनच सुरक्षित राहिल. गुरुवारी हे फीचर सुरु लाँच केले आहे.

Whatsapp
EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे आता युजर्संना कोणत्याही पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन कीवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांना फिंगरप्रिंट, फेस रिकग्निशन किंवा स्क्रिन लॉकद्वारे बॅकअप सुरक्षित करता येणार आहे. सध्या चॅट बॅकअपसाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. यामुळे तुमचे चॅट सुरक्षित राहणार आहे.

व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट काय आहे?

व्हॉट्सअॅपचे हे अपडेट एंड टू एंड एन्क्रिप्शनवर आधारित आहे. यामुळे तुमचे वैयक्तिक चॅट्स आणि कॉल्सची सर्व माहिती सुरक्षित राहणार आहे. जे युजर्स गुगल ड्राइव्ह आणि आईक्लाउडवर बॅकअप एन्क्रिप्ट करत आहेत. यासाठी त्यांना प्रत्येकवेळी तुम्हाला वेगवेगळा पासवर्ड टाकावा लागायचा.

नवीन Passkey ऑप्शन एन्क्रिप्शनसह सिक्युरिटी सिस्टीमशी सोडला जातो. यामुळे तुम्हाला बॅकअप सुरक्षित करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी फेस रिकग्निशन लागणार आहे. आता तुम्हाला वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.

WhatsApp चॅट पासकी कसं वापरायचं? (Whatsapp New Passkey Feature)

WhatsApp चॅट पासकी हे फीचर पुढील काही आठवड्यांमध्ये सुरु होईल. तुम्हाला सेटिंगमध्ये जायचे आहे. त्यानंतर चॅटवर क्लिक करा. त्यानंतर चॅट बॅकअप या ऑप्शनवर क्लिक करा यानंतर एंड टू एंड एन्क्रिप्टेड बॅकअपवर क्लिक केल्यावर हे फिचर सुरु होणार आहे.

एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय? (What is End To End Encryption)

व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यांनुसार,एंड टू एंड एन्क्रिप्शनमध्ये तुमचे मेसेज जास्त सुरक्षित असतात. तुम्हाला मेसेज आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीलाच तो दिसते. यासाठी एक की म्हणजेच लॉक असते.या मेसेजला व्हॉट्सअॅप अॅक्सेस करु शकत नाही.

Whatsapp
Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचा नवा धमाका! DP ला ठेवता येणार कव्हर फोटो, काय आहे नवीन फीचर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com