LIC Kanyadan Policy Saam Tv
बिझनेस

LIC Kanyadan Policy: लेकीच्या लग्नाची चिंता मिटली! रोज १२१ रुपये गुंतवा अन् २७ लाख मिळवा; LIC कन्यादान योजना आहे तरी काय?

LIC Kanyadan Policy: एलआयसीने मुलींसाठी खास कन्यादान पॉलिसी सुरु केली आहे. या योजनेत रोज १२१ रुपये गुंतवून तुम्हाला २७ लाख रुपये मिळणार आहे. २५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या मुलींच्या भविष्याची काळजी करतात. मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करतात. मुलींचे लग्न ही पालकांवरची खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळे आधीपासूनच आर्थिक बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही मुलींच्या भविष्यासाठी एलआयसी कन्यादान पॉलिसीत (LIC Kanyadan Policy) गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणूकीत चांगला फायदा होणार आहे.

एलआयसी कन्यादान योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला चांगली रक्कम जमा करु शकतात. या योजनेत तुम्ही रोज १२१ रुपयांची गुंतवणूक करुन २७ लाख रुपये मिळवू शकतात. जर तुम्ही रोज १२१ रुपयांची गुंतवणूक केली तर महिन्याला तुम्हाला ३६०० रुपये जमा करावे लागणार आहे. या योजनेत २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळू सखणार आहे.

एलआयसी कन्यादान योजनेत (LIC Kanyadan Yojana) १३ ते २५ वर्षांसाठी मॅच्युरिटी पीरियड घेऊ शकतात. जर तुमची मुलगी २ वर्षांची आहे आणि तुम्ही २५ वर्षांसाठी मॅच्युरिटी प्लानसाठी १० लाख रुपये एश्योर्ड प्लान घेत असाल तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. रोज १२१ रुपये गुंतवावे लागणार आहे. यानंतर २५ वर्षांनी म्हणजेच तुमची मुलगी २७ वर्षांची झाल्यावर तुम्हाला २७ लाख रुपये मिळणार आहे. तुम्ही गुंतवणूकीची रक्कम वाढवू किंवा कमीदेखील करु शकतात. याच्या आधारावर तुमची मॅच्युरिटीनंतरची रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

टॅक्स बेनिफिटदेखील मिळणार

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय किमान ३० वर्षे असावे. मुलीचे वय कमीत कमी १वर्ष असायला हवे. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्सपासून सूट मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १.५लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स भरावा लागणार नाही. या योजनेत जर मॅच्युरिटीच्याआधी काही दुर्घटना घडली तर कुटुंबातील सदस्यांना १० लाख रुपये दिले जातील. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला २७ लाख रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT