Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

Mahila Samman Savings Certificate A Smart Investment Option for Women: महिलांसाठी सुवर्णसंधी! ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेत गुंतवा, मिळवा खात्रीशीर व्याज.
Investment
InvestmentSaam
Published On

केंद्र सरकार सामान्यांसाठी विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा नागरिकांना होतो. केंद्र सरकारने २०२३ साली महिलांसाठी एक खास योजना सुरू केली होती. या बचत योजनेचा प्रत्येक महिलेला फायदा झाला. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे योजनेचे नाव आहे.

सध्या या योजनेवर महिलांना ७.५ टक्के व्याज मिळाले. जे महिलांना इतर कोणत्याही निश्चित बचत योजनेवर मिळाले नाही. या योजनेत एक रकमी रक्कम जमा केली जाते. ही योजना २ वर्षात परिपक्व होते. या योजनेत महिलांनी आतापर्यंत २ लाखा रूपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे.

१ लाख गुंतवा, १६,०२२ व्याज मिळवा

भारतातील राष्ट्रीय बँकेत महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडलेले आहेत. फक्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. फक्त महिलांसाठी असल्यामुळे पुरूषांना या योजनेचा लाभ मिळत नाही. पण अनेक पुरूषांनी पत्नी, आई किंवा बहिणीच्या नावे खाते उघडले होते.

Investment
Pune Crime: पुण्यात आईनेच बॉयफ्रेंडला पाठवले लेकीचे अश्लील व्हिडिओ, अनैतिक संबंध ठेवण्यासही पाडले भाग, पण शेवटी..

अनेक पुरूषांनी आपल्या पत्नीच्या नावे १ लाख रूपये गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मॅच्युरिटीनंतर यावर ७.५ टक्के व्याज मिळालेले आहे. म्हणजेच १६, ०२२ रूपयांचे मिळाले. अनेकांच्या बँक खात्यात १,१६, ०२२ इतकी मॅच्युरिटी रक्कम जमा झालेली आहे.

Investment
Kalyan: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, अटकेत असलेल्या आरोपीनं तुरूंगातच गळफास घेत आयुष्य संपवलं

काहींनी या योजनेत २ लाख रूपयांपर्यंत रक्कम गुंतवली होती. याचा अधिक फायदा महिलावर्गाला झाला आहे. पुरूषांना याचा लाभ मिळालेला नाही. परंतु काही पुरूषांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई किंवा पत्नीच्या नावे बँकेत खाते उघडले होते. तसेच त्यात २ लाखांपर्यंत पैसे गुंतवले होते.

योजनेसाठी तारीख वाढवण्याची शक्यता

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्यु गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. या योजनेमध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली. ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली, त्यांना याचा दीर्घकाळासाठी लाभ होणार आहे. या योजनेत आता गुंतवणूक करता येणार नाही. पण मिळालेला प्रतिसाद पाहाता केंद्र सरकार या योजनेसाठी तारीख वाढवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com