Kalyan: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, अटकेत असलेल्या आरोपीनं तुरूंगातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Vishal Gawli Hanged Himself Amidst Ongoing Trial: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी तुरूंगात असलेला नराधम विशाल गवळी या आरोपीने आत्महत्या केली आहे. गवळीने कारागृहातच पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

विशाल गवळी गेल्या साडेतीन महिन्यांपासून या गंभीर गुन्ह्यात अटकेत होता. कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशाल गवळीवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तळोजा कारागृहात रवानगी केली होती. आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२३ डिसेंबरला कल्याण पूर्वेत १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून नराधमाने लैंगिक अत्याचार केला. नंतर निर्घुण हत्या करून तिचा मृतदेह पत्नी साक्षी हिच्या मदतीने बापगाव जवळील निर्जन स्थळी फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करत आरोपी विशाल गवळी अटक करत त्याची रवानगी तुरूंगात केली.

तेव्हापासून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी नागरिक कमालीचे आक्रमक झाले होते. मागील चार महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून आरोपीच्या फाशीची मागणी लावून धरली होती.

तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन, राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विशाल विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले होते. त्याचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता.

Kalyan Crime
Maharashtra Politics: "चिलटं, डास येतच असतात, ढेकूण चावतोच..त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही"; निंबाळकरांकडून अजित दादांच्या आमदाराचा समाचार

यादरम्यान आज रविवारी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास विशालने कारागृहात टोवेलने गळफास घेत आत्महत्या केली आहे. कारागृह प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर आता विशालचे कुटुंबीय तातडीने तळोजा कारागृहाकडे रवाना झाले आहेत. मात्र त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेले जाणार असून, त्यानंतर मृतदेह कुटुंबीयाच्या हवाली केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दरम्यान विशालच्या फाशीनंतर कल्याण पूर्वेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून न्यायाला विलंब होत असताना नियतीने न्याय केल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com