Government Scheme: पाचवी पास महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेमुळे व्हाल स्वावलंबी, कमवाल लाखांच्या घरात

5th Pass Women Government Scheme: पाचवी पास झालेल्या महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येत आहे. ही योजना तेलंगणा सरकार खास महिलांसाठी राबवत आहे.
Women Empowerment
Women Empowermentrepresentative image
Published On

भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विशेष लक्ष देत आहेत. देशात असे एक राज्य आहे, जिथे पाचवी पास असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक योजना राबवण्यात येत आहे.

इंदिराम्मा महिला शक्ती असे योजनेचे नाव असून, ही योजना तेलंगणा सरकार खास पाचवी पास महिलांसाठी राबवत आहे. या योजनेद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येत आहे.

महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील

तेलंगणा सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी इंदिराम्मा महिला शक्ती योजनेची सुरूवात केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार सर्व पात्र महिलांना शिलाई मशीन पुरवते. या योजनेद्वारे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना शिलाई मशीन दिल्या जातात. तसेच आर्थिक मदत देखील केली जाते.

Women Empowerment
Political News: विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम, भास्कर जाधवांना पाठिंबा नाहीच; काँग्रेसला मात्र लोकलेखाच्या अध्यक्षपदाचे वेध

पाचवी पास असणे आवश्यक

इंदिराम्मा महिला शक्ती योजना तेलंगणा सरकार खास पाचवी पास महिलांसाठी राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी तेलंगणा राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे. या योजनेसाठी फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलाच अर्ज करू शकतात. अर्जदार महिला किमान पाचवी उत्तीर्ण असायला हव्यात.

Women Empowerment
Santosh Deshmukh: फरार कृष्णा आंधळे नाशकात, स्थानिकांचा दावा; पोलिसांची धावपळ

अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न १.५ लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार महिलेकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचं आहे. तसेच अर्जदाराकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. १८ ते ५५ वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com