Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! आता १५०० नाही तर २१०० रुपये मिळणार हप्ता; कधीपासून? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महायुती सरकार आता महिलांना २१०० रुपये देणार आहे.

Siddhi Hande

विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर महायुती सरकार महिलांना दर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे महिलांना लवकरच २१०० रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)

महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली आहे. याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना २१ एप्रिलपासून २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात सरकारने १ जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये दिले आहे. त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहि‍णींना २१०० रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे. (Women Will Get 2100 Rupees)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. आचारसंहिता संपल्यावर महिलांना पैसे मिळणार आहे. परंतु सध्या महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 18' मध्ये नवीन ट्विस्ट; मित्रच होणार शत्रू, सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

IPL Mega Auction 2025 Live News: आज १०० हून अधिक खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

Viral Video: OLA इलेक्ट्रीक स्कुटर दुरूस्तीला टाकलेल्या ग्राहकाला 90 हजारांचे बील, ग्राहकाने जे केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक

Ajit Pawar: 'थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...', अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

SCROLL FOR NEXT