Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकींच्या खात्यात जानेवारीत ₹१५०० आले, पण फेब्रुवारी-मार्चमध्ये नाही, नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात फेब्रुवारी अन् मार्चचे पैसे जमा झाले आहेत. अनेक महिलांना या दोन्ही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामागचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेत जवळपास ९ लाख महिलांना पैसे आलेले नाहीत. त्याचसोबत अजून ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

दर महिन्याला लाडकी बहीण योजनेत अडीच लाख महिला लाभ घेत आहेत.यातील लाखो महिलांना लाभ मिळालेला नाही. यामागचे कारण तुम्हाला माहितीये का? (Ladki Bahin Yojana )

दोन महिन्याचे पैसे का आले नाहीत?

या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यात जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत. तर फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहे. या ९ लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत. अजून मार्च महिन्याच्या पडताळणीत किती महिला बाद झाल्या आहेत याबाबात माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या महिन्यात बाद झालेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना जानेवारीचा हप्ता आलाय. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही. याचाच अर्थ असा की, तुमचा अर्ज कदाचित बाद केलेला आहे. निकषांबाहेर जाऊन जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

पैसे आले की नाही कसं तपासायचं?

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा झाले की नाही ते चेक करा. तुम्ही बँकिंग अॅपवर जाऊन खात्यात बॅलेंस किती आहे हे चेक करा. त्यावरुन पैसे जमा झालेत की ते कळेल. याचसोबत ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवरुनही तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही ते समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT