Ladki Bahin Yojana : लाडकीला 2100 रुपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी एका वाक्यात सांगितलं, VIDEO

Ladki Bahin Yojana update : लाडकींना २१०० रुपये कधी हा मुद्दा पकडत विरोधकांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले...मात्र त्याला उत्तर देताना मंत्री अदिती तटकरेंनी अत्यंत सुरक्षित आणि बचावात्मक उत्तर दिलंय...पाहुयात याचसंदर्भातला हा रिपोर्ट....
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana newsSaam tv
Published On

निकषांच्या पडताळणीमुळे लाडकींचा रखडलेला फेब्रुवारीचा हप्ता आणि या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हफ्ता लाडकीला दोन टप्प्यात देण्यात येतोय.....मात्र निवडणूक काळात मोठा गाजावाजा करत आम्ही १५०० चे २१०० करू असं दिलेलं आश्वासन मात्र अजूनही सरकारला पूर्ण करता आलं नाहीये....लाडकींनी महायुतीला भरभरून मतांनी निवडून दिले...मात्र निवडणूकांनंतर १५०० चे २१०० काही झाले नाही...आता नाही पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सरकार दिलेला शब्द पाळेल असं वाटच असताना लाडकींच्या पदरी मात्र निराशाच पडली.

Ladki Bahin Yojana
Shocking Video : काळ्या रंगाच्या कारचा कहर; रस्त्यावरील अनेकांना उडवलं, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

त्यामुळे आता विरोधकांना सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी आयतं कोलीत हाती मिळालं असून...विरोधकांनीही लाडकीला २१०० कधी देणार या मुद्द्यावरून अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरलंय. लाडकींना 2100 कधी, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला.

Ladki Bahin Yojana
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे कोण होते? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक प्रश्नांना उत्तर द्यायला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेत 2100 चा चेंडू मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांच्या कोर्टात ढकललाय.. '2100 चा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Ladki Bahin Yojana
Sanjay Raut Latest News : राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं मोठं कारण आलं समोर; पाहा Video

त्यामुळे आता फसवणार नाही मात्र 2100 देणार तरी कधी ? की महापालिकेच्या तोंडावर विधानसभेसारखाच डाव टाकत लाडकींना 2100 चं गाजर दाखवत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com