BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पगार १ लाख रुपये ; पात्रता काय? जाणून घ्या

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेत आरोग्य विभागाअंतर्गत नायर रुग्णालयात भरती जाहीर करण्यात आली आहे.
BMC Recruitment 2025
BMC RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नायर बालरोग विभागा सहाय्यक प्राध्यापक बालरोग, क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदांसाठी भरती कली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (BMC Recruitment)

BMC Recruitment 2025
Job Recruitment: आदिवासी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी; आदिवासी विकास खात्यात १५०० पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. १० मार्च २०२५ पर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.तीन रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. २४ फेब्रुवारीपासून भरती सुरु झाली आहे. यासाठी तुम्हाला अर्ज डिस्पॅच सेक्शन, जी-बिल्डिंग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल तळमजला, मुंबई – ४००००८ येथे अर्ज पाठवायचा आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाइटवर देण्यात आली आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी M.D/D.N.B Pediatrics पदवी प्राप्त केलेले असावी. क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रज्ञ पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम.ए पदवी प्राप्त केलेली असावी.

BMC Recruitment 2025
Teacher Recruitment : शिक्षक भरती कधी होणार? जाहीरांतीसाठी पुन्हा मुदतवाढ | VIDEO

या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक बालरोग पदासाठी १ लाख १० हजार रुपये पगार मिळणार आहे. मानसशास्त्रज्ञ पदासाठी ५० हजार तर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदासाठी ३० हजार रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असावी.

BMC Recruitment 2025
Bank Jobs: शिक्षण झालंय? युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी; २६९१ रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com