Bank Jobs: शिक्षण झालंय? युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी; २६९१ रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

Union Bank Recruitment 2025: यूनियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँकेत २६९१ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Union Bank Job
Union Bank JobSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँकेत २६९१ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Union Bank Recruitment)

Union Bank Job
BPCL Recruitment: पदवीधर आहात? भारत पेट्रोलियममध्ये आहे सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. तुम्ही www.unionbankofindia.co या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२५ आहे.

यूनियन बँकेची ही भरती देशभरातील ब्रँचसाठी होणार आहे. विविध राज्यात ही पदे भरती केली जाणार आहेत.महाराष्ट्रात एकूण २९६ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Union Bank Jobs)

ज्या विद्यार्थ्याचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही स्ट्रीममधील पदवी असणे गरजेचे आहे. १ एप्रिल २०२१ नंतर पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असणे गरजेचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Union Bank Job
Job Recruitment: आदिवासी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी; आदिवासी विकास खात्यात १५०० पदांची भरती

यूनियन बँकेतील या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर महिला व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Union Bank Job
SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; ११९४ पदांसाठी भरती; पगार ८०,००० रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com